रांके, लीओपोल्ट फोन
रांके, लीओपोल्ट फोन : (२१ डिसेंबर १७९५–२३ मे १८८६). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार. त्याचा जन्म ल्यूथरियन पंथाच्या कुटुंबात व्हीआ (म्युरिंजिया-सॅक्सनी) येथे झाला. हाल व बर्लिन विद्यापीठांत त्याने दैवकशास्त्र आणि प्राचीन अभिजात वाङ्मय ह्यांचा अभ्यास करून पदवी मिळविली आणि फ्रँकफुर्ट येथे अध्यापकाची नोकरी धरली; तथापि त्याचा ओढा ऐतिहासिक कागदपत्रांच्या चिकित्सक व साक्षेपी संशोधनाकडेच अधिक होता.